डॉक्टरांचा सल्ला आता घरबसल्या मोफत

देशभरात सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक प्रकारच्या आजारांसाठी किंवा अचानक एखादा व्यक्ती आजारी पडला आणि त्यांना बाहेर दवाखान्यात जाणे शक्य नसल्यास किंवा आजूबाजूला वैद्यकीय सेवा न मिळाल्यास घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी भारत सरकारच्या  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्यावतीने ही मोफत आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ताप येतोय, बरं वाटत नाहीये अशा अनेक प्राथमिक स्वरूपाचे आजार असतील तर ते www.esanjeevaniopd.in या वेबसाईट वर जाऊन तेथे तुमची माहिती रजिस्टर करून डायरेक्ट डॉक्टरांसोबत आपल्याला असणाऱ्या आजारा संबंधी चर्चा करू शकतात. यासाठी व्हिडीओ कॉल सुविधा देण्यात आली आहे. त्याच वेळी डॉक्टर त्यावरील उपचार आणि औषधें घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन तुमच्या मोबाइल वर पाठवतील. ते प्रिस्क्रिप्शन मेडिकल मध्ये दाखवून रुग्ण औषधे घेऊ शकतात. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये कुणीही अनावश्यक गरज नसताना बाहेर पडू नये यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.