काष्टी(प्रतिनिधी)कोरोना संकटात काष्टी येथील महेश्वर पतसंस्था आणी महेश्वर मल्टीस्टेट सोसायटीने गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी 35 पोती तांदूळ देत सामाजिक जबाबदारीत मोलाचा वाटा उचलला आहे.काष्टी येथे 200 पोती धान्य आणी जीवनावश्यक वस्तुचे वाटप गोरगरीब आणी गरजू व्यक्ती आणी कुटुंबास करण्याच्या गावकरी आणी ग्रामस्थ यांच्या निर्णयात महेश्वर चे चेअरमन आणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गावडे गुरुजी यांनी तब्बल 35 पोती धान्य देवून सामाजिक जबाबदारी निभावत गरजूंना मदतीचा हात आणी आधार देताना खारीचा वाटा उचलत आपली मदत तात्काळ उपलब्ध करुन देत संकटात माणुसकी चे नाते जपत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.या संकटकाळात आणी कोणत्याही कठिण प्रसंगात सामाजिक जबाबदारी ठेवून प्रत्येक वेळी मदतीचा पतसंस्थेच्या वतीने वेळोवेळी सहकार्याचा प्रयत्न केला आहे आणी यापुढे देखील असा प्रयत्न केला जाईल अशी माहिती चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते काष्टी येथील दत्तात्रय गावडे गुरुजी यांनी वादळी स्वातंञ्य बरोबर बोलतांना दिली.महेश्वर पतसंस्था आणी महेश्वर मल्टीस्टेट सोसायटीच्या अहमदनगर आणी पुणे जिल्ह्यात अनेक शाखा आहेत.वेळोवेळी सामाजिक आणी आर्थीक मदत देत विविध उपक्रमात पतसंस्था आग्रभागी असते असे गावडे शेवटी म्हणाले.
महेश्वर पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिले 35 पोते तांदूळ: