धोका आहे..ग्रामीण बेफिकीरच❗कोरोना चे जागतिक संकट अचानक उभा राहिले.ग्रामीण भागात मात्र जनता बेफिकीर आणी नियम मोडायला टक लावून बसलेली दिसली.त्यामुळे ग्रामीण भागातील बेफिकिरी या कोरोना संकटात नियम आणी शासकीय आदेश झुगारुन ज्यांनी ज्यांनी मुद्दाम आतताईपणा केला त्या जनतेस याची खुप मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागणार हे मात्र निश्चीत आहे.नियम न पाळता स्वतःच्या सोबत गावाचा आणी कुटुंबाचा जीव वेशीला टांगणारे माहभाग फक्त शहरात किती रुग्ण वाढले आणी कसे वाढले याच्या चर्चा कोणतेही सामाजिक आंतर न ठेवता जमेल तिथे करतांना दिसत आहेत.2 पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास आणी तोंडावर मास्क आथवा रुमाल न बांधल्यास आपणास जागतिक, महाराष्ट्रातील,मुंबई,पुणे येथील कोरोना रुग्ण आणी त्यांचे मृत्यु ,गंभीर आजार आणी त्याचा संसर्ग माहीत आसुन देखील निर्लज्जा सारखे वागत असतील तर या मूर्ख वा आतिशहाणे यांना कोण समजविणार.सरकार, पोलीस यंत्रणा,डॉक्टर,ग्रामीण भागातील अधिकारी यांनी सांगून, सुचना देवून देखील मरणाचे दु:ख आणी सोयरसुतक नसणारी निर्बुद्ध माणसे काहिच एकत नसतील तर गावच संपविण्याचा ठेका यांनी घेतला असे समजण्यास हरकत नाही.धार्मिक स्थळे बंद करा,कोणत्याही समाजाची असोत,एकत्र आणी सामुहिक पणे कोणते कार्यक्रम करणेबाबत बंदी आहे तरी देखील गावात मोक्याच्या ठिकाणी एकत्र जमणे,गप्पा,चर्चा करणे हे कितपत योग्य आहे.टी.व्ही आणी दवंडी देवून,ध्वनिक्षेपक लावून देखील लोक एकत नसतील तर या लोकांना कोणती भाषा समजते आथवा समजवावी लागेल.कारण येवढे गांभीर्य नसेल तर संसर्ग आणी एका चुकीमुळे किती जीव जातील हे लक्षात घेणे गरजेचे आहे.एखादा तोंड बांधत नाही,त्याला लगेच कारवाई करायला ग्रामीण भागात मर्यादा आहेत,मात्र लोकांचे जीवन-मरण यावर आवलंबून असेल तर ग्रामीण भागात देखील या नियमांची अंमलबजावणी करणे आणी होणे गरजेचे आहे.त्यासाठी फक्त काही आवश्यकता नसणारे पर्याय सोडून ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, आधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यांची मदत पोलीस प्रशासन, तहसीलदार, तालुका वैद्यकीय आधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, स्थानिक शिक्षक, आंगणवाडी कर्मचारी,आरोग्य विभागातील कर्मचारी यांना एक दिवस शक्यतो काही माहिती ग्रामस्थ आणी जनतेस न होवू देता आचानक तपासणी करुन दंडात्मक आणी जरब बसेल अशी कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.नियम 1 दा मोडला तर 1000 दंड, दुसर्या वेळी मोडला तर दुप्पट आणी तिसर्या वेळी मोडला तर केस दाखल करुन जेल मधे पाठविणे सारखी कडक कारवाई झाली तर ग्रामीण आणी शहरी भाग कोरोना संसर्ग पासुन मुक्त होवू शकतो.मात्र ग्रामीण भागात ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य आधिकारी गावात थांबतात का❓ याचे आत्मपरीक्षण हे नियम बंधनकारक करताना जनतेच्या सुरक्षा,जीव वाचविण्याचे दृष्टीने प्रत्येक तालुक्यातील जबाबदार आधिकारी यांनी स्वत: करणे गरजेचे नाही तर आत्यावश्यक आणी आपरिहार्यच आहे.आन्यथा ग्रामीण भाग कोरोना संकट आणी त्याच्या धोकादायक संसर्ग पसरण्याच्या विळख्यात आडकन्याची शक्यता कोणीच नाकारु शकत नाही.यासाठी नियमांची आंमलबजावणी कठोर निर्णय घेवून करणेसाठी वरिष्ठ आधिकारी आणी प्रशासन यांनी साखळी करणे गरजेचे आहे.
अग्रलेख - धोका आहे..ग्रामीण बेफिकीरच