घन:शाम शेलार यांची सामाजिक बांधिलकी :श्रीगोंदा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष,श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष घन:शाम शेलार यांनी कोरोना संकटात सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपला वाढदिवस साजरा न करता ती तब्बल 1 लाख 2 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीस दिली आहे.शेलार यापूर्वी विविध सामाजिक उपक्रमात,आंदोलनात श्रीगोंदा तालुक्यात सक्रिय आसतात.ते यापूर्वी शिवसेनेत आणी भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. 2 वेळा त्यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढविली आहे.महाराष्ट्र राज्य साखर संघाचे ते संचालक आहेत.पाणी प्रश्नासह विविध आंदोलनात आणी सर्वसामान्य जनतेच्या छोट्या-छोट्या प्रश्नांसाठी आण्णा या नावाने प्रसिद्ध आसणारे घन:श्याम शेलार हे स्वतःच्या गाडीत संबंधित व्यक्तीस घेवून जावुन तो प्रश्न सोडवित आपली सामाजिक आणी माणुसकी जपत आनोखी काम करण्याची पद्धत वापरुन जनतेच्या सुख-दु:खात कायम कार्यरत आसतात.आक्रमक पद्धतीने कामे करत त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे तर अहमदनगर जिल्हा आणी महाराष्ट्र राज्यात आपली वेगळी ओळख कायम ठेवून राजकिय क्षेत्रात आपला ठसा उमटवित शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी त्यांची विशेष ओळख कायम आहे.श्रीगोंदा येथील भाजप आमदार,माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी देखील राजकिय भुमिका बाजुला ठेवत या नेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शेलार यांनी वेळोवेळी संघर्ष करत आपली सामाजिक ओळख कायम ठेवत संकटात वेळोवेळी आर्थीक मदत देत सामाजिक जबाबदारी निभावली आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शेलार,प्रा.संजय आनंदकर,सुनिता हिरडे,मीनल भिंताडे,प्रकाश निंभोरे, तहसीलदार,पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.
घन:शाम शेलार यांची सामाजिक बांधिलकी :श्रीगोंदा