श्रीगोंदयात पत्रकार शिवाजी साळुंके यांच्यावर हल्ला

श्रीगोंदा (प्रतिनिधी) साप्ताहिक वादळी स्वातंञ्य आणी दैनिक सार्वमत चे प्रतिनिधी आणी दक्ष या सामाजिक संघटनेचे संचालक पत्रकार शिवाजी साळुंके यांचेवर श्रीगोंदा येथे आज वार्तांकन करत असतांना अनधिकृत पणे चारी फोडून पाणी घेत असलेल्या अनेक शेतकरी यांनी एकत्र येत फोटो काढत आसल्यामुळे चर्चा करत असतांना श्रीगोंदा येथील चारी नंबर 11 जवळ येवुन त्यांना जबर मारहाण केली.अनधीकृतपणे पाणी घेत असताना या जमावाने साळुंके यांचेवर हल्ला करत त्यांची दुचाकी चारित ढकलून देत मारहाण केली.या घटनेचा जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते,वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे,दक्ष चे दत्ताजी जगताप,धनेशजी गुगळे, पत्रकार विशाल चव्हाण, बाळासाहेब काकडे,सुनिल कारंजकर,मीरा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब फाळके,मनसे चे सतीष पाचपुते, सामाजिक कार्यकर्ते आनंता पवार, मदन गडदे,गणेश गडदे, भागवत वायभासे,खुलेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुनिल दरेकर,यांनी निषेध करत गुन्हेगार असतील त्यांचेवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. श्रीगोंदा तालुक्यात पोलीस प्रशासन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गांभिर्याने कारवाई करत नसल्यामुळे आरोपी मोकाट सोडून नुसताच देखावा करत असल्यामुळे तालुक्यातील पत्रकारांवर गुन्हेगारी प्रवृतीची माणसे जीवघेणे हाल्ले चढवित आहेत.पोलिसांनी कायद्याचा धाक बसवून गुन्हेगार आणी आरोपी यांना जेलची हवा दाखवायची तयारी ठेवावी.साळुंके यांना कुकडीच्या 11 नंबर चारी वरील  टेलच्या शेतकऱ्यांनी पाणी कमी येत असल्याची तक्रार केली. म्हणून श्री. शिवाजी साळुंखे 11 नंबर चारी ने आपल्या मोटरसायकलवर पाण्याची पाहणी करत असताना सदरची चारी औटेवाडीच्या काही लोकांनी फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वेतळी ज्यांनी चारी फोडलेली आहे, अशा लोकांनी शिवाजी साळुंखे यांच्यावर हल्ला करून, त्यांची मोटरसायकल चारीत टाकून दिली. कुकडीच्या पाणी चोरी करण्याच्या या प्रकाराचा सर्वत्र निषेध होत आहे.


महाराष्ट्राने दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी शासकीय राजपत्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू केलेला आहे. पत्रकारावर हल्ला करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे या गुन्ह्याची चौकशी पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिला जावा तसेच
आधिकारी राजकिय आणी आर्थीक दबाव घेवून काहिच कारवाई करत नाहित असा अनुभव यापूर्वी आला असल्यामुळे याप्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास केंद्रीय गृहमंत्री,गृहसचिव,राज्यपाल,माहिती व जनसंपर्क मंत्री,राज्याचे गृहमंत्री,गृह राज्यमंत्री यांचेकडे तक्रार करु असा ईशारा वादळी स्वातंञ्य चे संपादक जितेंद्र पितळे यांनी सालुंके यांचेवर हल्ला प्रकरणी दिला आहे.