श्रीगोंदयात आढळले मृतावस्थेत काळवीट

श्रीगोंदा (प्रतिनिधी) येथील पंतनगरमध्ये ग्रामीण रुग्णालयाजवळ  एक काळवीट मृत्युमुखी पडलेले आढळले आहे. वन्यजीव पाण्याच्या तसेच अन्नाच्या शोधात सर्वत्र भटकंती करत आहेत. याचदरम्यान काल रात्री या काळविटाचा नैसर्गिक मृत्यु झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. यासंदर्भात वनविभागाच्या दिघे मॅडम यांना फोन केल्यानंतर त्यांनी कर्मचारी वर्गास पुढील कारवाईच्या सुचना दिल्या. यावेळी वनपाल हौसराव गारुडकर, वनरक्षक नितिन डफडे, चालक अनिल यादव व दक्ष नागरिक फाऊंडेशन चे दत्ताजी जगताप यांनी या काळविटास उचलुन शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी मदत केली. यावेळी वनविभागाकडून तात्काळ मदत केल्याबद्दल दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.