सामाजिक जाणिव ठेवून चिंभळा येथील डॉक्टर सचिन जाधव यांची कोरोना साठी मोफत औषध वाटप मोहीम: कोरोना च्या संकटात चिंभळा येथील सामाजिक कार्यकर्ते आणी व्यवसायाने डॉक्टर आसलेल्या सचिन जाधव यांनी सामाजिक जबाबदारी आणी जाणीव ठेवत लोणीव्यंकनाथ, मढेवडगाव,चिंभळा,शिरसगाव बोडखा,चिखली,कोरेगाव,बोरी,काष्टी आणी परिसरात तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन,बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये आणी दौंड येथील एस.आर.पी. गृप येथे साईसेवा बहुऊद्देशीय सेवा प्रतिष्ठान मार्फत होमिओपॅथिक औषधी आर्सेनीक आल्बम चे मोफत वितरण केले आहे.कोरोना पासुन बचाव होण्यासाठी या गोळ्या आशा सेविका आणी गावातील आंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक यांचे मार्फत घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत.या गोळ्या घेताना काही पथ्य पाळणे आणी शासनाचे सर्व नियम पाळणे आवश्यकच आसुन सामाजिक आंतर ठेवून चहा,कॉफी,लसुण,कच्चा कांदा खाणे टाळावे असे डॉक्टर. जाधव यांनी वादळी स्वातंत्र्य बरोबर बोलताना अधिक सविस्तर माहिती देताना सांगितले.या कोरोना प्रतिबंधक औषधी गोळ्या या 3 वर्षे वयापुढील सर्वांनी दररोज 4 ते 5 गोळ्या सकाळी काहीही न खाता उपाशीपोटी चघळाव्यात आणी 3 वर्षाच्या आतील सर्वांना 2 ते 3 गोळ्या द्याव्यात.तीन दिवस या गोळ्या घ्यवयाच्या आहेत. एक महीन्यानंतर परत या गोळ्या घ्यावयाच्या आहेत,त्यामुळे शिल्लक आणी जास्त गोळ्या जपुन ठेवाव्यात आणी याबाबत काही अधिक माहिती हवी आसेल,शंका असतील तर माझ्या भ्रमणध्वनी वर संपर्क करावा असे आवाहन डॉ.जाधव यांनी केले आहे. संपर्क क्र.डॉ.सचिन जाधव,चिंभळे.9890145309.
चिंभळा येथील डॉक्टरांकडून परिसरात मोफत औषध वाटप