श्रीगोंद्याच्या मातीतला साहित्यिक काळाच्या पडद्याआड
'झुलवाकार' साहित्यिक स्व. उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने जुन्या आठवणींना श्रीगोंदेकरांनी दिला उजाळा
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एनकुळ चे मुळेच असलेले तुपे कुटुंब शंभर माणसाचा काबिला घेऊन श्रीगोंदयात औटी वाडी जवळ राहायला आला यात प्रमुख होते ते राघू तुपे आणि उत्तम तुपे यांचे वडील बंडू तुपे हे १९४५ सालच्या आसपास केकताड सोलण्यासाठी साताऱ्या हुन ही मंडळी श्रीगोंदा तालुक्यात आली .इथे विशु औटी ,केसू औटी यांच्या वस्तीजवळ बिऱ्हाड टाकली होती जवळ असलेल्या घायपत पासून वाख तयार करण्यासाठी ही मंडळी काम करत असताना हिरडे कुटुंबानी सहकार्य केले .घायपत जास्त असल्याने आजही या वाडीला घायपतवाडी अशी ओळख आहे .
उत्तम तुपे काही काळ औटीवाडी श्रीगोंदा येथे राहिले नंतर बेलवंडी येथे मराठी शाळे जवळ जगताप मळ्यात फार दिवस होते, बेलवंडीतील दिपचंद वायदंडे यांचें ते पाहुणे आहेत. त्यांचे बालपण हे बेलवंडीत, श्रीगोंद्याच्या आसपास गेलें याचा उल्लेख त्यांच्या काट्या वरची पोटं या आत्मचरित्र मध्ये येतो.
गरजेपुरते शिक्षण असूनही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तब्बल 50 हुन अधिक पुस्तकांची निर्मिती. यामध्ये कथा , कादंबरी , आत्मचरित्र यांचा समावेश आहे . त्यात तत्कालीन समाजतील भयाण वास्तव मांडणार लिखाण साहित्यनिर्मिती या वाचनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे .
१९ ४५ साली श्रीगोंदा येथे आलेले तुपे कुटूंबाचा परंपरागत वाख व्यवसायत या कुटुंबातील सदस्यांनी श्रीगोंदयाचे नाव राज्यभर पसरले ते वाख उद्योगात याच तुपे पारिवारातील साहित्यिक असलेले उत्तम बंडू तुपे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . आणि त्यांच्या विषयी येथील दशरथराव तुपे(गुरुजी )यांनी त्यांच्या आठवणी ताज्या केल्या .
साहित्यिक उत्तम तुपे यांचे बालपण श्रीगोंदयात गेले त्यांचे जे झाले ते जेमतेम शिक्षण सातवी पर्यन्त इथच झाले. आठवीत गेले मात्र तत्कालीन परिस्थिती त पुढे शिक्षण घेता आले नाही .बालपणापासून मनात जाती भेदाची उतरंड आणि चळवळ यातून आपल्या समाजाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी सतत काम करताना कुणावर अन्याय होऊ नये जर अन्याय होत असले तर त्या विरोधात आवाज उठवण्याची धमक असलेले कै. उत्तमराव पुढे ही हाच विचार घेऊन काम करत राहिले .तत्कालीन परिस्थितीत असणारी समाजातील भेदाभेद याबाबत त्यांनी शालेय जीवनात केलेल्या संघर्ष आणि त्यानंतर या शाळेतले बदलले वातावरण आणि सर्व विद्यार्थ्यांना मिळालेली सारखी वागणूक यातून पिण्याच्या पाण्यासाठी खुली झालेला पाण्याचा आड हा केवळ उत्तमराव आणि त्यांचे चुलत बंधू कै.बाजीराव तुपे यांच्या आंदोलनामुळेच हाच विचार घेऊन पुढे त्यांच्या वस्तीजवळ पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर त्यांनी खोदली.शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण शेळ्या वळताना लिहण्याचा छंद पुढे उत्तम समाजमन मांडणारा साहित्यिक झाला .इथे त्यांचे सहकारी मल्हारराव घोडके, मोटे पाटील ,बापू औटी,दहातोंडे, दांडेकर यांच्यासह अनेक जण आहेत .पुढे बेलवंडी येथे काही दिवस गेल्यावर दुष्काळी परिस्थिती असल्याने बेलवंडी मधून विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे नगरीत स्व.उत्तम तुपे स्थिरावले .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातले भेदभाव मिटवण्यासाठी केलेले काम याच बरोबर साहित्य निर्मिती ही समाजाला दिशा देणारी ठरली .त्यांच्याच विचाराने या तुपे कुटुंब तसेच नातेवाईक यांच्या घराघरातला मुलाने शिक्षणाची कास धरली कोण मंत्रालयात सचिव आहेत तर कुणी शिक्षक झाले तर अनेक जण वन खात्यात नौकरीला लागले ते केवळ शिक्षणामूळेच असे येथील १७५ जण शासन दरबारी नौकरी करत असल्याचे तुपे गुरुजी यांनी सांगितले .श्रीगोंद्याच्या परिसराला माहीत असलेला उत्तम तुपे हे पुढे दर्जेदार साहित्य निर्मिती करणारा मनामनात सर्व समाजाचे वास्तव मांडणारा साहित्यिक झाले त्यांनी लिहलेले वास्तव शालेय अभ्यासात आले .कथा कादंबरी वर नाटक ,चित्रपट निघाले मात्र हा माणूस कायम जमिनीवर राहिला .एखाद्या विषयाचे लिखाण करायचं असेल तर त्याच परिस्थितीशी एकरूप होऊन जाऊन लिखाण करताना झुलवा जोगतीणीच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले.त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.साहित्यिक म्हणून उत्तम बंडू तुपे त्या साहित्य यात - आंदण (लघुकथासंग्रह),इजाळ (कादंबरी),काट्यावरची पोटं(आत्मचरित्र),कोबारा(लघुकथासंग्रह),खाईकादंबरी),खुळी (कादंबरी),चिपाड (कादंबरी),झावळ (कादंबरी),झुलवा (कादंबरी),पिंड (लघुकथासंग्रह),भस्म (कादंबरी),माती आणि माणसं (लघुकथासंग्रह),लांबलेल्या सावल्या (कादंबरी),शेवंती (कादंबरी),संतू (कादंबरी).हे साहित्य निर्मिती करणारे उत्तम तुपे यांचे ‘काट्यावरची पोटं’ हे तुपे यांचे आत्मचरित्र महाराष्ट्र राज्य पुरस्कारास पात्र ठरले होते.यात या भागातील चित्रण मांडलेले आहे . श्रीगोंद्याच्या मातीत तयार झालेला साहित्यिक यांचे आयुष्य खडतर परिस्थितीचा सामना करत गेले मात्र समाजातील वास्तव त्यांनी आपल्या लिखाणात मांडले .त्याच निधन झालेची बातमी माध्यमातून आली आणि एक हिरा माणूस काळाच्या पडद्याआड गेल्याच दुःख मनात असताना व्यक्ती जरी जग सोडून गेला तरी त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि लिहलेले साहित्य हे अजरामर राहणार आहे .श्रीगोंदा येथील त्यांचे चुलत बंधू, नातेवाईक,या ना या लॉकडाऊनच्या काळात उत्तम तुपे यांच्या अंतदर्शनाला जाता आले नाही याचं दुःख सगळ्या वस्तीला झाले .
मी .स्व.उत्तम बंडू तुपे या साहित्यसागरा विषयी लिहण्याचा प्रयत्न केला आहे .त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांचे साहित्य अभ्यासनाचा संकल्प करून हे लिहिले आहे.
शिवाजी साळुंके ,श्रीगोंदा ,९८९००५४३४३
टीप ;बहुतांशी माहिती ही त्यांचे सहकारी त्यांचे बंधू असलेले तुपे गुरुजी यांनी दिलेली आहे.)