साईसेवा पतसंस्थेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
काष्टी येथील साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ करिता रक्कम ५१,००० रुपये २४ एप्रिल २०२० रोजी आरटीजीएस ने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ SBI Ac 39239591720 या खात्यावर वर्ग केली आहे. साईसेवा पतसंस्थेने नेहमीच आपल्या विविध कार्यातून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला कोणत्याही प्रकारची कमी पडू नये यासाठी फुल ना फुलांची पाकळी म्हणून साईसेवा पतसंस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाचपुते, व्हा. चेअरमन उत्तमराव मोरे, व्यवस्थापक गणेश डोईफोडे व सर्व संचालक मंडळ यांनी दिली आहे.