मंथन परीक्षेत सार्थक सुभाष गायकवाड राज्यात आठवा


श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जि.प. प्राथ . शाळा काळेवाडी ( चिंभळे ) ता .श्रीगोंदा या शाळेतील विद्यार्थी सार्थक सुभाष गायकवाड इ .४थी याने 300 पैकी २८६ गुण मिळवून हंगेवाडी केंद्रात प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळविला 
            त्याला वर्गशिक्षिका श्रीम. आदिका काळे मॅडम, तसेच महांडूळे सर व आई वडीलांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी सय्यद साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी कलगुंडे साहेब , केंद्र प्रमुख शिंदे साहेब , चिंभळे गावचे सरपंच रमेश आण्णा गायकवाड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सर्व सदस्य व ग्रामस्थांनी सार्थक चे अभिनंदन व कौतुक केले आहे.