लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील अंबिका विद्यालयातील गेली 15 वर्ष विनाअनुदान तत्त्वावर सेवा करणारे शिक्षक *श्री कपिलेश्वर उल्हारे यांचा नुकताच अपघात झाला होता, त्यांची अर्थिक परिस्थिती अतिशय हलाकिची होती.
श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेने केलेल्या आव्हानाला तालुक्यातील सर्व शिक्षक बंधूंनी व मुख्याध्यापक बंधूंनी तसेच महाराजा महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व सेवक आणि जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद दिला श्री कपिलेश्वर यांना रोख रक्कम 111530 रुपये जमा झाले अशी माहिती *श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष- श्री राजेंद्र खेडकर यांनी दिली.
खरंतर राज्यातील विनाअनुदानित शिक्षक वर्ग अतिशय अडचणीतून आपला प्रपंच चालवत आहेत शासनाने गेली 15 वर्ष विनाअनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना 20 टक्के प्रमाणे टप्प्या-टप्प्याने अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी संघाचे सचिव तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक- श्री दिलीपराव काटे यांनी केली काही दिवसापूर्वी कपिलेश्वर उल्ल्हारे यांचा श्रीगोंदा मांडवगण रोडवर अपघात झाला होता या अपघातात श्री उल्हारे सर जबरी जखमी झाले होते त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले होते त्यांना शिक्षक संघटनेने मदत केल्यानंतर शिक्षक बंधू-भगिनींनी मोठा प्रतिसाद देऊन फार मोठी मदत दिली आहे
अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष श्री उध्दव गायकवाड यांनी दिली. ही मदत करणे कामी श्री बाबासाहेब भोस,श्री बाजीराव कोरडे,श्री एम.एस.लगड,श्री रमजान हवालदार, श्री रामदास जंजिरे, श्री संतोष गायकवाड गुरुजी, तंत्रस्नेही म्हणून श्री दिलीप तुपे, सचिन झगडे, श्री अनिल खंडागळे यांनी विशेष सहकार्य केले तसेच श्री चंद्रकांत गायकवाड, भास्कर जगताप, पंढरीनाथ सुपेकर, मच्छिंद्र धोत्रे, हरिश्चंद्र नलगे, बापूराव गायकवाड, देविदास खेडकर, राजेंद्र जामदार, निवृत्ती शेलार, दिगंबर पुराने, शहाजी हिरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच श्री कपिलेश्वर उल्हारे यांना आज ज्येष्ठ नेते श्री बाजीराव कोरडे सर, संघाचे अध्यक्ष- राजेंद्र खेडकर, सचिव- श्री दिलीपराव काटे, संघाचे उपाध्यक्ष- श्री उद्धव गायकवाड, श्री दिलीप तुपे श्री सचिन झगडे श्री सुरेश जठार यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्द केली.