महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना तर्फे कामगारांना वेतन देण्याची मागणी

पुणे(प्रतिनिधी) ज्यांच्याकडे घरेलु कामगार काम करतात त्यांनी लॉक डाऊन काळातील घरेलु कामगारांना माणुसकीचा दृष्टीकोन ठेऊन पगार दयावा असे आवाहन महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना ,महाराष्ट्र प्रदेश पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे. पुणे शहर व महाराष्ट्र राज्यात अनेक घरांमध्ये  मध्ये जाऊन स्वयंपाक,धुनी भांडी,झाडू फरशी , लहानमुलांना  सांभाळण्याची काम करणारे घरेलु कामगार महाराष्ट्र मध्ये लाखोच्या संख्येने मोठ्या प्रमाणावर आहेत. या क्षेत्रात महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.  मिळ नाऱ्या अल्प मजुरी शिवाय दुसरे ऊत्पनाचे  साधन नाही. महाराष्ट्रात  कोरोना व्हायरसाचा  संसंर्ग टाळण्यासाठी व सामाजिक भान जपण्यासाठी मा.पंतप्रधान व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लाॅक डाऊन घोषणा करून जनतेला आवाहन केलं आहे.


      देशहित समाजहिता करिता  घरेलू कामगार कामावर जावू शकल्या नाहीत. किंवा कामावर येऊ नका असे सांगितल्या मुळे घरेलू कामगार,  कामावर जाऊ शकत नाहीत ,यांचं ऊत्पनाचे दुसरे  साधनच नसल्यामुळे   घरेलु कामगारांना ऊपास मारीला  सामोरे जावे लागत आहे. (काही घरमालक मानवतेच्या दृष्टीकोनातून घरेलु कामगारांना  या काळात मदत करीत आहेत .त्यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन ) परंतु अशा घरमालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. .या कामगारांची परिस्थिती हालाखीची झालेली आहे या करिता सर्व घरमालक यांनी घरेलु कामगार कामावरती न आल्याबद्दल कोणाचेही पगार वजावट करू नये, माणूसकी चा दृष्टीकोन ठेवावा असे नम्र आवाहन महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र, पुणे चे प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी केले आहे.