श्रीगोंदा कारखाना (प्रतिनिधी) नगर दक्षिणचे माजी खासदार
दिलीप गांधी यांच्या वाढदीवसानिमित्त करोना आजारा पासून बचाव करणे साठी श्रीगोंदा फँक्टरी परीसरात मोफत मास्क वाटप व जे वाटसरू गावाकडे चाललेत अशा वाटसरू व ट्रक ड्रायव्हर यांना राहूल भंडारी व दीपक बांगर यांनी १०० जनाची जेवणाची व ६०० मास्कची व्यवस्था स्वखर्चातून केली आहे अशी माहिती राहुल भंडारी यांनी दिली आहे. तसेच या कार्यासाठी दीपक बांगर,कल्पना कांबळे मॅडम अनिस हवालदार, आशोक ढेपे, मोहीत धोका,दीवेकर,तोरडमल,शेजवळ,औटी सतोंष, कंकटवार गणेश, संतोष टकले, शिरवळे, स्वप्निल सोबले
पोटे मामा, कवार बंटी, रोहीत बांगर, दवणे नाना,सोबले नाना,इथापे विकी,अनिल पवार,दळवी पांडा पिनू कुरूमकर व जिव्हाळा फाऊंडेशन चे सर्व सदस्य यांनी विशेष मदत केली त्यांचे राहूल भंडारी यांनी विशेष आभार मानले. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या वाढदिवसा निमीत्त श्रीगोंदा फाकट्री येथील युवकांनी सामाजिक उपक्रम राबवित एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
श्रीगोंदा कारखाना येथील युवकांनी ठेवला आदर्श