शंभुजयंती निमित्त किल्ले धर्मवीरगडावर "शौर्यस्थळाचें" पूजन करून गरजूंना किराणा वाटप

शंभुजयंती निमित्त किल्ले धर्मवीरगडावर "शौर्यस्थळाचें" पूजन करून गरजूंना किराणा वाटप     


पेडगाव(प्रतिनिधी) येथील धर्मवीर गडावर दिनांक १४ मे रोजी छत्रपती शंभुराजांच्या जयंती निमित्त शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने किल्ले धर्मवीरगडावरील  'शौर्यस्थळाचे" पुजन करण्यात आले.  यावेळी धर्मवीरगडाच्या गडपालांसह अन्य गरजूंना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.  या मदत कार्यासाठी माजी सैनिक आघाडीचे विशेष योगदान लाभले.
            सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे यावर्षी मोजक्याच शंभुभक्तांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत गडावरील शंभुराजांच्या शौर्यस्थळाचे पूजन शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आले व छत्रपती शंभुराजांचा जयघोष करण्यात आला.  यावेळी शंभुसेना सोशियल मीडिया प्रमुख प्रकाशजी म्हस्के, लक्ष्मीकांत राजेशिर्के, प्रा.शिवाजी क्षिरसागर, ह.भ.प. परशुराम खळदकर, नवनाथ क्षिरसागर, प्रणव क्षिरसागर, गडपाल भाऊसाहेब घोडके, गडपाल नंदकुमार क्षिरसागर, गडसेवक मच्छिंद्र पंडित, आदीसह शंभुभक्त उपस्थित होते.