राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामाबाबत अनेकांच्या मध्ये समज गैरसमज असले तरी संघाचे सामाजिक बांधिलकीच काम अनेकांना माध्यमांच्या मधून माहीत होतं असते .गरज असेल तिथे उभे राहणे ,सामाजिक प्रश्न सोडवणे यासाठी घरच्या भाकरी खाऊन काम करणारे स्वयंसेवक एक तासाची *शाखा ही साधना समजून रोज शाखेत जात असतात एक तासात तिथे खेळ,व्यायाम,दंड लाठी ,सूर्यनमस्कार असे विविध कार्यक्रम रोज नियमित करत असताना .रोजच्या शाखेत होणारे संस्कार यातून मिळणारी प्रेरणा आपल्या देशासाठी ,धर्मासाठी, गावासाठी आपल्या परिसरात आपल्या समाज बांधवासाठी जमेल ते सेवा कार्य सुरू होते .यातूनच संघाचे जनकल्याणासाठी चे काम सुरू आहे.
१९७२च्या दुष्काळात दुष्काळ विमोचन समितीचे माध्यमातुन सुरू झालेले संघाचे काम पुढे जनकल्याण समिती च्या माध्यमातून सुरू आहे .१९७२ या भीषण दुष्काळात ग्रामीण भागात अन्नदान पुरवणे ,जनावरांना चारा ,पुढे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे देणे असे अनेक काम सुरू असताना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव आणि मांडवगण भागात या काळात केलेली मदतीची आठवण सांगणारे आजही अनेक जुने माणसे आहेत.
स्व .शरदराव कटकर ,स्व.दामुआण्णा दाते यांच्या सह सर्व कार्यकर्ते याचा भागात या निमित्ताने झालेला प्रवास आजही संघाने केलेले कामाची पावती देत आहे. पुढे अशीच कामे जनकल्याण समितीच्या माध्यमातून स्वयंसेवक करत आहेत. २०१२-१३ साली अश्याच दुष्काळी परिस्थितीत *तालुक्यातील वडघुल कामठी भागात वन्य प्राण्यांच्यासाठी पानवठे मध्ये नियमित पाणी टाकणे ,टँकरने पाणी पुरवणे असे काम करत असताना, पंचायत समितीच्या उदभवावर वीज गेली तर टँकर भरण्याचे काम सुरु रहावे यासाठी डीझल इंजिन देण्याचे काम केले. शाश्वत जलसंधारण पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्याचे काम सुरू झाली.यातही मांडवगण मधील सिद्धेश्वर मंदीराच्या लगत कटाक्ष आणि वटाक्ष नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरण काम करत या गावातले पाणी गावात अडवण्यासाठी जनकल्याण समिती ने तीस लक्ष निधी उभा केला. याठिकाणी जलसंधारण कामाच्या बरोबरच भानगाव मध्ये देखील नदीचे रुंदीकरण ,खोलीकरण केलं.पुढे अशीच काम सुरू असताना
शहरातल्या जळीतग्रस्त कुटुंबाना आधार देण्याचे कामही स्वयंसेवकानी केले.
आताही लॉकडाऊनच्या काळात देशभर संघाचे सामाजिक काम सुरू आहेत .भुकेल्याना अन्न देणे ,वैद्यकीय सेवेत सहकार्य करणे ,गरजूंना किराणा देणे ,प्रशासकीय कामात गरज असल्यास सहकार्य करणे अशी कामे सुरू आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात देखील रा.स्व.संघ जनकल्याण समितीने जमेल ते काम करण्याचा संकल्प करत समाजाचे सहकार्य घेत २५ दिवस अन्नछत्र चालवले यात आठ हजाराच्या आसपास अन्नपाकीट वितरण याच बरोबर पहिल्या टप्प्यात साठ गर्जूवंत कुटुंबाना किराणा मालाचे साहित्य दिले .याच बरोबर पंचवीस कुटुंबाना धान्य दिले.तर यानंतर ही हातावर पोट असणाऱ्या कारागीर कुटुंबाना १५किराणा मालाचे कीट दिले.या कामात समाजातले अनेक व्यक्ती काहींना काही मदत देण्यासाठी पुढे येत आहेत.समाजाच्या सहयोगातून हे काम सुरू आहे.पुढे ही हे काम सुरूच राहणार आहे.
संघाचे स्वयंसेवक आपले घर ,प्रपंच ,नौकरी ,व्यवसाय याच बरोबर या सामाजिक कामात तन,मन धन समर्पित करून खारीचा वाटा म्हणून काम करत आहेत.
या मानवी जीवनावर आलेल्या संकटात खूप गोरगरीब लोकांचे व परप्रांतीय लोकांचे हाल झाले तरी आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी शाखा काष्टी संघाचे काही स्वयंसेवक यांनी काष्टी येतील गर्जूवंतांना कर्तव्यचा हात दिला.
१.काष्टी येथील बंदोबस्तला असणाऱ्या पोलीस बांधवाना चहा पानी व त्यांची त्या ठिकाणी रात्री बसण्याची व्यवस्था केली.त्यासाठी आपल्या एका स्वयंसेवकाने त्यांच्यासाठी स्वतःचे टमटम त्यांना पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी दिले .
२.काष्टी येथील आलेल्या मजुरांना त्यांचा मालक आर्थिक मदत देत नव्हता तर आपल्या एका स्वयंसेवकाने त्यांच्या मालकासोबत चर्चा करून त्यांना २ महिना पुरेल एवढे आर्थिक मदत करून दिली.
३. २ मे रोजी पुण्यावरून आलेले परप्रांतीय लोकांना संध्याकाळ व सकाळ ची जेवणाची व्यवस्था करून त्यांना मेडिकल चेकअप करून पोलीस ठाण्यात हजर केले . तेथून त्यांना त्यांच्या राज्यात पोहच करण्यात आले.
४. शाखेच्या एका स्वयंसेवकाने १४ मे धर्मवीर संभाजीराजे जयंतीला लहान मुलांना स्वतः तयार केलेले मास्क वाटले.
श्रीगोंदा येथे मा.तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजे नुसार
१) २६ दिवस अन्नपुर्णा योजना नावाने अन्नछत्र दररोज अंदाजे ३५० प्रमाणे ८५००ते ९००० अन्न पाकिटे वाटप दररोज १५ ते १६ स्वयंसेवकांचा सहभाग.
२) ६० किराणा किटचे वाटप.
३) गरजे नुसार धान्य वाटप चालू
बेलवंडी येथे पोलीस बांधवांसाठी व आशा सेवीकांसाठी १४० मास्क व ८० सँनिटायझर वाटप करण्यात आले.
पारगाव गरजुंसाठी ५० भाजीपाला किट वाटप व ४०किट किराणा वाटप करण्यात आले.
संघाचे काम नेमके काय आहे. हे सांगण्याचा विषय नाही. मात्र जो संघात येतो, शाखेत येतो तो संघाचा स्वयंसेवक झाले शिवाय राहत नाही. या कामात अरविंद कासार, शिवाजी साळुंके यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील संघ स्वयंसेवकांनी मदतीत सहभाग घेतला.
शब्दांकन- जितेंद्र पितळे.
**************************************************
जाहिरात