खबरदार यापुढे कोणी गावात घुसखोरी केली तर कठोर कारवाई करू ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांचा निर्धार
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या लिंपणगाव परिसरात कोणी बाह्य व्यक्ती शिरकाव करून गावामध्ये कोरोना सारखे गंभीर आजार पसरविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ,त्या व्यक्तींवर आता ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ कठोर निर्णय घेऊन योग्य ते शासन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. .दरम्यान लिंपणगाव च्या कार्यक्षेत्रातील नागवडे कारखाना परिसरामध्ये नुकताच एक 32 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आला आहे .त्यामुळे गावामध्ये बाह्य व्यक्ती व नव्याने गावांमध्ये येऊन बिनधास्तपणे ग्रामपंचायत मालकीची जागा पकडून येथे अवैध धंदे सुरू केले जातात .त्यामुळे अनेक जण या अवैध धंद्यांना बळी पडलेले असून, कोरोना सारखा गंभीर आजार गावामध्ये या विविध बाह्य लोकांच्या संपर्कामुळे सदरचा संसर्गजन्य आजार पसरू शकतो, अशा गंभीर तक्रारी ग्रामस्थांमधून गेल्या एक महिन्यापासून होत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी लिंपणगाव च्या कार्यक्षेत्रातील नागवडे कारखाना परिसरामध्ये अशाच एका व्यक्तीचा कोरोना चा एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर लिंपणगाव मध्ये बुधवारी 27 मे रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गंभीर आजाराला सामोरे जाण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य जालिंदर कुरुमकर यावेळी म्हणाले की, ग्रामपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी हा कोरोना हटाव व आरोग्य बचाव यासाठी खर्च करून प्रत्येक वॉर्डातील होणारा खर्चिक निधी याला कात्री लावून तो निधी प्रत्येक वॉर्डांमध्ये मास्क व सनि टायझर प्रत्येक ग्रामस्थांना मोफत देण्यासाठी खर्ची टाकावा, तसेच आणि कुटुंबांमध्ये दहा व्यक्ती असताना फक्त पाचच व्यक्तीना लाभ मिळतो याबाबत चौकशी केली असता, अनेक ग्रामस्थांचे रेशनिंग ऑनलाइन केलेले दिसत नाही श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी याबाबत लक्ष घालून लिंपणगाव परिसरामधील रेशन धारकांना संबंधित यंत्रणेमार्फत रेशन कार्ड ऑनलाइन करून घेण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा कशा प्रकारचा ठराव करून अशा दोन मागण्या श्री जालिंदर कुरुमकर यांनी यावेळी मांडल्या.
गावचे उपसरपंच पोपटराव माने यावेळी म्हणाले की, सध्या गाव परिसरामध्ये अनेक बाह्य व्यक्तींनी गावातील ग्रामपंचायत हद्दीतील जागेमध्ये अतिक्रमण करून विनापरवाना पै पाहुण्यांना येथे आणून देखील परस्पर जागा बळकावल्या आहेत. अशा आमच्या निदर्शनास आले आहे . त्यामुळे तेथे दारू मटका जुगारी या सारखे अवैध धंदे सुरू केले आहेत. त्यामुळे गावामध्ये सद्यस्थितीला दूषित वातावरण निर्माण होत असून ,अनेक तरुण मुले या गंभीर धंद्याकडे ओळताना दिसत आहेत. त्याचा परिणाम कुटुंबाच्या प्रगती होत असून, गेल्या दोन महिन्यापासून कोरोना या भीषण स्वरूपा च्या विषाणूने प्रसार हा संपूर्ण जगामध्ये नव्हे तर आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यातच पिंपळगाव परिसरातील नागवडे कारखाना परिसरात एक अशाच प्रकारचा कोरोना ग्रस्त व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यामुळे सध्या हा परिसर प्रशासनाने शील केला असून, 14 जणांना कोरंनटाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे लिंपणगाव व इतर वाड्या-वस्त्यांवर सदरचा आजार पसरू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहून गावात चालू असलेले अवैध धंदे पूर्णतः बंद करून त्यामुळे बाही व्यक्तीदेखील दारू पिण्यासाठी गावांमध्ये येत असतील तर अशा व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय गावच्या ग्राम सुरक्षा दलालांमार्फत करणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
या बैठकीस माजी सरपंच अरविंद कुरुमकर ,उपसरपंच पोपटराव माने, ग्रामपंचाायत सदस्य जालिंदर कुरुमकर, नवनाथ बडवे, संस्थेचे चेअरमन दादा कुरुमकर, किरण कुरुमकर, मोहन कोपनर, ,शेटीबा पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब ओहोळ, तलाठ्याचे प्रतिनिधी बाबू लष्करे, उमेश वेताळ, वाल्मीक कुरुमकर, हरिदास जगताप, राहुल लष्करे ,सतीश भगत, रहीम शेख, अण्णा कणसे, पंडित लष्करे, विक्रम कोयते, योगेश कुसाळकर, ,लखन कुसाळकर ,ग्राम विकास अधिकारी श्री जगताप आदींसह गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा निर्धार व्यक्त केला आहे.