अहमदनगर (प्रतिनिधी) कोविड१९ च्या प्रादुर्भाव असलेल्या संक्रमित क्षेत्र सोडून इतर ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालू ठेवण्याचे सुधारित आदेश अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी आज ६ मे रोजी काढले आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री सकाळी ५ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा दिली आहे. तसेच डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास चालू ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिले आहेत. सदर आदेशाचे कुणीही उल्लंघन करू नये. उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.
पेट्रोल पंपांचे सुधारित वेळे बाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश