कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नाभिक समाजाला आर्थिक मदत द्यावी- पै.अजय रंधवे.

अहमदनगर (प्रतिनिधी) कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड ते दोन महिन्यापासून बंद असलेला नाभिक व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आलेला नाही व सुरू झालेला नाही. हा समाज अत्यंत गरीब असून कारागीर व सलून मालकांचे उपासमार होत आहे. संसारी वस्तू व आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेले असून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना राज्य सरकार कडून मिळालेली नाही . परंतु कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपये प्रत्येकी सलून चालक व मालक यांना मदत जाहीर केलेली असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने असाच निर्णय घेऊन नाभीक समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती अहमदनगर प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व युवक जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळाचे अध्यक्ष पै.अजय रंधवे यांनी आज माहिती दिली.