कुठे काय चालू होणार याबाबत राज्य शासनाकडून आदेश जारी

लोणी व्यंकनाथ (प्रतिनिधी) अनेक दिवसांपासून लोकडाऊन मध्ये अडकलेल्या जनतेला दिलासा देणारी माहिती आज शासनाकडून मुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली आहे. कोणत्या सेवा आणि दुकाने कोणत्या झोन मध्ये चालू होणार आहेत आणि चालू होणार नाहीत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या सर्व सूचना आणि नियम यांचे पालन करून या सेवा आणि सुविधा सुरू करणे सर्वांना बंधनकारक असेल.