मढेवडगाव (प्रतिनिधी) येथील स्वर्गीय सूशिलकूमार अमृतलाल गूगळे यांचा प्रथम पूण्यस्मरण निमीत्त नवकार क्लिनिक मढेवडगाव व श्रीनिवास मेडीकल श्रीगोंदा यांचे संयुक्त विद्यमाने कोरोना आजाराला प्रतिबंधात्मक म्हणुन अर्सेनिक अल्ब 30 (Arsenic Album 30) या औषधाचे मोफत वाटप मढेवडगाव येथे करण्यात आले. हे औषध देण्यासंदर्भात सरकारने गाईड लाईन दिलेल्या आहेत व त्या संदर्भातील परिपञक ही काढलेले आहे.अनेक राज्ये जसे केरळ,गुजरात,गोवा,येथे प्रभावीपणे अर्सेनिक अल्ब 30 प्रतिबंधात्मक वापर केला गेल्यामुळे या कोरोनाच्या साथीत याचे खुप चांगल्या पध्दतीने उपयोग होताना दीसुन येत आहे. या औषधाचे डोस खालीलप्रमाणे घ्यावेत.
5 वर्षाहुन लहानांसाठी-रोज उपाशीपोटी 1गोळी 3 दिवस
5 ते 10वर्षासाठी रोज उपाशीपोटी 2 गोळ्या 3 दिवस
10 वर्षापुढील सर्वांना रोज उपाशीपोटी 4 गोळ्या 3दिवस
गोळ्या घेतल्यानंतर 30 मिनीटे काही खावू नये असे डॉक्टरांनी सांगितले आहे. हे औषध जन्मलेल्या बालकापासुन ते ज्येष्ठ नागरीक कोणीही घेवु शकतो. तसेच मधुमेह,ब्लड प्रेशर तसेच ईतर तक्रारी असणा-यानां देखील घेता येते. यापासुन कसलेही (Side Effects) नाहीत. औषध चालु असताना कच्चा कांदा, लसुन,चहा काँफी घेवु नये. या औषधांबाबत काही शंका वाटल्यास तसेच मोफत औषधासाठी मढेवडगाव येथे नवकार क्लिनिक डॉ.महावीर भंडारी 8805231111 तसेच श्रीगोंदा येथे श्रीनिवास मेडीकल शितलकुमार गुगळे 9421928760 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.