पुणे (प्रतिनिधी) लॉकडाऊन झाल्यामुळे अडकलेल्या विद्यार्थी, मजूर, पर्यटक आणि इतर व्यक्तींना आपल्या राज्यात किंवा जिल्ह्यात, गावात जाण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील आदेश क्र. डीएमयु/2020/सीआर/92/एम-1 दि. 30/04/2020 रोजीच्या आदेशान्वये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव लाॅकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार/ पर्यटक/ विद्यार्थी यांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत आदेश प्राप्त झालेले आहे.
सदर आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र शासनाने आवश्यक त्या उपाय योजना करुन कामगारांना मुळ गावी पोहोचविणेकामी वाहतुक व्यवस्था व तदनुषंगिक कार्यवाही करणेबाबत उक्त आदेशान्वये सुचना दिलेल्या असून कामगारांना परत मुळ गावी पाठविणेची परवानगी देणेत आलेली आहे. शासनाने सदर आदेशामध्ये खालील निकष विचारात घेऊन कार्यवाही करणेच्या सुचना दिलेल्या आहे.
१. ज्या कामगारांना आपल्या गावी मुळ परत जावयाचे आहे अशा कामगारांनी आपली नाव नोंदणी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचे कार्यालयाकडे नावनोंदणी इमेलदवारे व दुरध्वनी संदेशादवारे करणेत यावी.
२. ज्या लोकांना हालचाल करावयाची इच्छा आहे अशा लोकांची तपासणी केली जाईल आणि कोव्हीड-१९ लक्षणे किंवा लक्षणे न दर्शविणाऱ्यांनाच मुळ गावी जाणेची परवानगी जिल्हा प्रशासनाकडुन देणेत येईल.
३. पुणे जिल्हयातुन इतरत्र म्हणजे त्यांच्या मुळ गावी पाठविणेत येणाऱ्या कामगारांची वैदयकीय तपासणी करण्यात योईल . आणि त्यांच्यामध्ये कोव्हीड-१९ ची कोणतीही लक्षणे नसल्यासच त्यांना मुळ गावी पाटविणेबाबतची विनंती विचारात घेतली जाईल
४. मुळ गावी पतरणाऱ्या कामगारांची संख्या व त्यांची ठिकाणे विचारात घेऊन वाहतुक आराखडा तयार करणेत येईल. व संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व राज्य प्रशासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या मुळ गावाकडे रवाना करणेत येईल.
५. सर्व स्थलांतरीत कामगार, विदयार्थी व पर्यटक यांना आव्हान करणेत येते की, त्यांनी कोणतीही घाईगरबड न करता संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी दुरध्वनीवरुन अथवा इमेलदवारे आपली नाव नोंदणी करावी.
तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे
- तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – tahsildarhavelipune@gmail.com
- अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – apartahsilpimparichinchwad@gmail.com
- तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – tahasildarpunecity@gmail.com
- तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – tahsilmaval@gmail.com
- तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – tehsilmulshi@gmail.com
- तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – tahsilshirur@gmail.com
- तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – tahsilbhor@gmail.com
- तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – tahsilvelhel@gmail.com
- तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – tahsildarpurandar@gmail.com
- तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil junnar@gmail.com
- तहसिल कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – tahasilambegaonp@gmail.com
- तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – tahsilkhed@gmail.com
- तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – tahsildaundl@gmail.com
- तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur tahsil@gmail.com
- तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – tahsildarbmt@gmail.com