श्रीगोंदा तालुक्यात सध्या खुप तडजोडी होत आहेत.आर्थिक नव्हे बोलण्याच्या असे वरवर खाकी वर्दीत दिसते. पण ज्या सर्वसामान्य,गोर गरीब आणी अन्याय झाला आहे त्याला न्याय द्यायला हात लकवा झाल्यासारखे होतात पण पुढारी आणी पदाधिकारी म्हटले की गोळी तर सोडा साधा काठी चालवायचा परवाना मिळत नाहीच हे दिसुन आले. खाकी वर्दीचा धाक आणी रुबाब तसेच जरब ही कुठे, कोण, का, कधी, कशी बसविते ते तालुक्यातील जनतेला दिसले आहे. कुठे कोरोनात सिंघम म्हणून पाठ थोपटून घेत स्वतःच्या कार्य आणी कर्तुत्व याचा अभिमान बाळगत आसताना आपल्याच खात्यात काय काय होते, चालते, करवून घेतात हे सामान्य माणुस म्हणुन तालुक्यात या खात्याविषयी दोन चार दलाल आणी तडजोडी करणारे प्रमुख आठ दहा टाळकी सोडली तर कोण चांगले म्हणतो का याचे आत्मपरीक्षण करावे.
आपल्या खात्याचा कारभार चांगला नाही. तेथे उर्मट आणी उद्धट वागणुकीचा नियम आहे. तो शासकीय नाही एवढीच काय ती मेहेरबानी आहे तालुक्याच्या जनतेवर. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यावर काय कार्यवाही केली जाते याचे उत्तर या खात्यातील वरिष्ठ आधिकारी कधी जनतेला देणार, किती जण मद्य प्राशन करुन आणी किती जण तडजोडी करुन या ठिकानी जा-ये आणी उठ-बस करतात, सर्वसामान्य लोकांना कशी वागणुक देता या कार्यालयात आल्यानंतर त्याचे उत्तर कोण देणार आहे तालुक्यातील जनतेला, कोरोना संकट आहे म्हणून किती जनांणी आपले उखळ विविध छापे,धाडी आणी आवैध धंदे आथवा जुगार आणी दारु,मटका,पत्ते यातुन किती तडजोडी केल्या गेल्या,जातात याचा हिशोब कोणी,कसा द्यायचा आणी घ्यायचा आहे. सामान्य माणसाला वेगळा न्याय आणी पुढारी वर्गास एक न्याय ही का तुमच्या खाकी वर्दीची मर्दूमकी, तडजोडी आणी मिटवामिटवी हे प्रकार म्हणजे सगळ्यांच्या मनासारखं झालं का, हा न्याय सर्वांना का दिला जात नाही अथवा देवू शकत नाही याचे कधी सोयरसुतक का वाटू नये. ईथे कोणाला बळीचा बकरा बनविले गेले आणि हे तालुक्यात हासू झाले त्याची नैतिक का अनैतिक जबाबदारी घेवुन प्रायश्चित्त कोण घेणार, कनिष्ठ कर्मचारी आणी अल्पसंख्याक अथवा कमी दर्जा आहे म्हणुन त्याला तोफेच्या तोंडी घालून आपली पोळी भाजून घेतली म्हणजे सगळे झाले की सगळे नामानिराळे आणी मोकळे, हा न्याय प्रामाणिक काम करणाऱ्या सर्वसामान्य पोलीस हवालदार किंवा शिपाई यांच्यासाठी लागू असेल आणि त्यांना अडचणीच्या वेळी तोफेच्या तोंडेला देऊन बदली करून आपले पितळ झाकण्यासाठी वापर करावा लागणे हे स्वतःचा कर्तबगार करंटेपणाच म्हणावा लागेल.
हे खाते कोण चालविते हे वेगळे सांगायला कोण्या ज्योतिषाची कधीच गरज पडणार नाही. कोणाचे हात कोणाच्या खाली गुंतले आहेत हे जनतेला माहीत नाही का जनता दुधखूळी आथवा बोळ्यानी दुध पिते असे कोणी समजू नये. हे पेल्यातील वादळ आहे की वादळा पुर्वीची शांतता आहे हे आगामी काळात दिसेल अथवा समजेल मात्र यातुन हाथ आणी दात गुंतलेले असतात, आहेत, होतेच हे स्पष्ट झालेच. व्हायचा तो सिंघमचा तमाशा देखील तालुक्यानी पाहिला आणी खाकी वर्दीचा धाक आणी धोका हा फक्त सर्वसामान्यांना आहे. ईतर लोक आणी व्हीआयपी व्यक्ती यांच्या ताटा खालची मांजरे देखील किती डोळे बंद करुन दुध पितात आणी गोर गरीब जनतेवर कशी गुरगुरतात हे मात्र आधोरेखीत झाले आणी सत्यता वेगळी आसली तरी करायचे एक आणी दाखवायचे एक हे नाटक आणी तमाशे सगळीकडे रोज डोंबऱ्याच्या खेळाप्रमाणे या खात्यात दलाल हितासाठी चालते, खपते आणी खपवूणच घेतात, घेतले जाते. फक्त लाल,काळे,पांढरे करता येईल तो जिंकत असतो हे लक्षात आले. मलिदा आणी प्रकरण दाबणे हे कर्तव्य ठरले आणी सोशल मिडियात खरे आणी स्पष्ट बोलल्यामुळे ज्यांना मिरच्या झोंबल्या असतील त्यांनी आता आपले आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुर्तास तालुक्यातील जनतेला अशी ही बनवाबनवी ऐवजी अशी ही मिटवामिटवी चा कोरोना संकटात घरी बसुन मोफत चित्रपट पाहता आला हे देखील त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. कोरोना संकटकामी जेवढी प्रतिष्ठा मिळवली तेवढी सर्व प्रतिष्ठा या पुढाऱ्यांपुढे सपशेल नांगी टाकल्याने गमावली असे म्हणावे लागेल.