कोरोना' ही जागतिक महामारी,संयम ढळू न देता प्रशासनाला सहकार्य करा- राजेंद्र नागवडे

'कोरोना' ही जागतिक महामारी,संयम ढळू न देता प्रशासनाला सहकार्य करा- राजेंद्र नागवडे
तालुका प्रशासनाची कौतुकास्पद कामगीरी


श्रीगोंदा (प्रतिनिधी)- 'कोरोना' विषाणू संसर्ग ही जागतिक आपत्ती आहे.या जागतिक महामारीने अनेकांना प्राण गमवावा लागला आहे.भारताने 'कोरोना' विरुध्दचा लढा मोठ्या धैर्याने लढला आहे.प्रशासनाने घातलेली बंधने आपल्या सुरक्षिततेसाठीच आहेत.'कोरोना' लढ्यात तालुका प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेवून तालुक्यात 'कोरोना'चा शिरकाव होवू दिलेला नाही.नागरिकांनी आणखी संयम व धैर्य  ठेवण्याची गरज आहे.आपल्या व कुटुंबासह समाजाच्या सुरक्षिततेसाठी तालुक्यातील जनतेने  प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
नागवडे म्हणाले की,जगाच्या तुलनेत देशात 'कोरोना' प्रसाराचा वेग कमी आहे .केंद्र व राज्य सरकारने वेळीच पावले उचलून प्रतिबंधक उपाययोजना सुरु केल्या तसेच टाळेबंदी जाहीर केल्याने भारताला काही अंशी कोरोनाला रोखण्यात यश येत असले तरी बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे ही विशेष चिंतेची बाब आहे.त्यात महाराष्ट्रात कोरोना बाधित  रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने आपण घेतलेली खबरदारी ही अत्यंत महत्वाची आहे.अपवाद वगळता ग्रामीण भागात अद्याप कोरोनाचा फैलाव नाही.मात्र प्रशासनाने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास स्वतःसह  कुटुंबाची व  समाजाची  सुरक्षितता धोक्यात येवून कोरोनाचा प्रादूर्भाव होवू शकतो म्हणून आता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशभरातील लाॅकडाऊन सरकार हळूहळू शिथील करीत आहे.मात्र जवळपास दोन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.मात्र तरीही सरकारने व स्थानिक प्रशासन यांनी घातलेले निर्बंध आपल्या हितासाठी आहेत हे लक्षात ठेवून या निर्णायक वेळी नागरिकांनी अधिक संयम व धैर्य ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. स्वतःला, कुटुंबाला व आपल्या समाजाला कोरोना पासून सुरक्षित ठेवणे ही खरेतर आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडूच नका असे आवाहन केले आहे. 


तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नागवडे कारखान्यानी सर्वप्रथम ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांना सामाजिक बंधीलकीमधून मदत केली आहे. श्रीगोंदा तालुका कोरोनापासून अद्याप सुरक्षित राहिला आहे. यात येथील नागरिकांच्या सहकार्याबरोबर सर्वाधिक श्रेय स्थानिक प्रशासनातील तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, बेलवंडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरविंद माने, तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे या अधिकारी व त्यांच्या योध्या सैनिकांनी अहोरात्र कष्ट घेत तालुक्याचा कोरोना पासून केलेला बचाव कौतुकास्पद आहे असे सांगून नागवडे म्हणाले की आज पर्यंत आपण सर्वांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद असून उतावीळपणा न करता असेच सहकार्य प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.