अखेर कुकडीचे आवर्तन सुटले पण......

अखेर कुकडीचे आवर्तन सुटले पण........ श्रीगोंदा ला मिळणार 25 जून नंतर


 

       लिंपणगाव( प्रतिनिधी) कुकडी प्रकल्प ज्यादिवशी ठरले त्याच दिवशी आवर्तन सोडण्यात आले काल शनिवारी रात्री येडगाव धरणातून धरणातून 500 क्युसेसने पाणी सुरू करण्यात आले. श्रीगोंद्याच्या वाट्याला पाच दिवसाचे प्रत्यक्षातील पाच दिवसाचे आवर्तन येत आहे. कुकडी धरणातील आवर्तन आवरून श्रीगोंदे व कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसात राजकारण तापले होते .दरम्यान आता रोटेशन सुटल्याने चर्चा थांबणार असल्या, तरी खऱ्या अडचणीही सुरू झाल्या आहेत. कारण श्रीगोंद्याच्या वाट्याला पाच दिवसाचे आवर्तन येत असून, 410 दशलक्ष घनफूट पाणी येत आहे. कर्जतला सात दिवस आणि करमाळ्याला सहा दिवसाचे आवर्तन सुटणार आहे. श्रीगोंदा ला पाणी येण्यास 25 जून उजणार आहे. त्यानंतर पाणी सुरुवात होईल. श्रीगोंद्यातील पाझर तलाव यांना पाणी देण्याबाबत अधिकारी विचार करीत असतानाच त्यातच आमदार बबनराव पाचपुते यांनी पाझर तलावात पाणी सोडण्याची यादी देत तेथे पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.आवर्तन शेतीचे करण्याचे स्थानिक पातळीवर ठरले आहे.

       

                                 विसापूर चे रोटेशन लांबले 

 

       दरम्यान आमदार पाचपुते यांच्या उपोषणात विसापूरची आवर्तन सोडण्याची तयारी दाखविणाऱ्या कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी घूमजाव करीत निर्णय फिरवला आहे. कुकडीचे काही पाणी विसापूर मध्ये घेऊन विसापूरची आवर्तन करू असे त्यांनी पाचपुते यांना सांगितले. असून तसाच निर्णय झाल्याचे काळे यांनी सांगितले. मात्र आता विसापूर चे रोटेशन थेट जुलैमध्ये सोडणार का ? असा प्रश्न उपस्थित होत असून, विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर ठरवून जलसंपदा विभागाने अन्याय केल्याचे स्पष्ट झाले आहे.