लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा फॅक्टरी येथील दहा महिन्याच्या बाळाने अखेर हरविले कोरोनाला. जिल्ह्यातील सर्वात कमी व सर्वात जास्त वयाने दोन्हीही कोरोना रुग्ण श्रीगोंद्यातील आहेत यातील दहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवून एक प्रकारचा विक्रमच केला आहे. 85 वर्षाच्या आजी मात्र कोरोनाग्रस्त आहे.
श्रीगोंदा फॅक्टरी येथील या दहा महिन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाला ठणठणीत झाल्याने घरी सोडण्यात आले. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ खामकर पुढे म्हणाले की, आज दहा दिवसापूर्वी या बाळाला कोरोना झाला होता. घरातील त्याचा चुलता करुणा पॉझिटिव्ह आला आणि या बाळाला बाधा झाली. त्यामुळे अनेकांच्या काळजाचे ठोके वाढले होते. त्याचे नशीब बलवत्तर होतेच परंतु आरोग्य यंत्रणेने देखील या बाळाला कोरोनातून सहीसलामत बाहेर काढण्यात यश मिळविले.आता तालुक्यातील दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी दिली.