श्रीगोंदा (प्रतिनिधी) कोरोना संकट खुप मोठे आहे.घरात बसा म्हणून काही पाठ स्वतःच थोपटून घेणारे आधिकारी देखील तालुक्यात आहेत.पुढारी तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत,परंतू नेमक्या आणी गरजेच्या मुलभुत सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहित यासाठी ना कोणत्या पुढारी अथवा आधिकारी यांनी महावितरणच्या आधिकारी आणी कर्मचारी यांना जबाबदार धरले ना सर्वसामान्य जनतेची वीज नाही म्हणून ग्रामीण सह शहरी भागात कोणी विचारपूस केली.लॉकडावुन आहे म्हणून सर्व घरात बसतात. उन्हाळा आहे तरी देखील सलग बारा-बारा आणी काही ठिकाणी चोवीस-चोवीस तास वीज नाही. अनेक उद्योग-व्यवसाय,धंदे हे वीज असेल तर चालू शकतात.काहींचे तर उदरनिर्वाहचे साधनेच वीज आहे असे असुन देखील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
वीज वितरणचे आधिकारी आणी कर्मचारी आणी ग्रामीण भागातील काही कर्मचारी तर कधीच काम करत नाहित.फक्त आजचे काम उद्या वर ढकलून देत हे कर्मचारी मनमानी करत आहेत.काही जण पुढारी आणी ग्रामसेवक यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवित कामं करण्यास टाळाटाळ करत असतात.अनेक ठिकानी जुन्या वायरी,पोल,खांब,तारा जीर्ण झाल्या आसुन पोल वाकलेले आहेत तरी देखील पावसाळा आणी वादळी वारे याची नोंद घेवून योग्य त्या दुरुस्त्या आणी उपाययोजना करणे गरजेचे, क्रमप्राप्त आसुनदेखील वर्षानुवर्ष हे प्रकार सुरु आहेत.
तालुक्यातील आधिकारी आणी सब स्टेशन मधील आधिकारी तसेच कर्मचारी हे फक्त आर्थिक तडजोडी करुन कामे करत आसल्यामुळे ग्रामीण भागात शेतीला देखील पुरेशी वीज उपलब्ध नसते तर गावठान असुन देखील नियमाविरुध्द सतत आणी सलग बारा ते चोवीस तास वीज गायब होते.परंतु दुरुस्ती मात्र तात्काळ होत नाही.त्यामुळे या आधिकारी आणी कर्मचारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी मेहेरबान आहेत का, आर्थिक तडजोडी किती होतात आणी वीजबील भरून देखील घरगुती आथवा व्यापारी आणी शेतकरी ग्राहक यांना वाऱ्यावर सोडून हे महवितरण चे आधिकारी कर्मचारी काय आणी किती, कशा पद्धतीने कामे करतात याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई वरिष्ठ आधिकारी यांचेसह तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार यांनी आणी लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार,ग्रामसेवक,सरपंच यांनी वेळोवेळी घेणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो, हजारो रुपये महसूल वीजबील नियमित भरून या खात्यास सामान्य वीज ग्राहक देतात मात्र सोयी आणी सुविधा यांची खुप दुरावस्था असते.
वीज गळती आणी चोरी होते ती थांबविणे गरजेचे आहे. नियमित आणी अखंडीत वीजपुरवठा सामान्य वीज ग्राहकांना उपलब्ध होण्यासाठी महावितरणच्या बेलवंडी, श्रीगोंदा विभागातील आणी तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी आगामी काळात घेवुन नियमानुसार कामे करावीत. जास्त आणी मनमानी पद्धतीने वीज बिल आकारणी करु नये आणी अनधिकृत पणे कोणाचाही वीजपुरवठा तात्काळ खंडीत करु नये आशी मागणी शेतकरी आणी नियमित वीज बिल भरणारे वीज ग्राहक यांनी वादळी स्वातंत्र्य शी बोलताना व्यक्त केली आहे. अन्यथा ग्राहक नाईलाजास्तव आंदोलन छेडतील याची नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महवितरण कडे करण्यात आली आहे.