लॉकडाऊनमध्ये सामाजिक बांधिलकीतून गरजुवंतांना मदतीचा हात.
येळपणे (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील, मौजे येळपणे पिसोरे, पोलीसवाडी येथे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एकूण ६२४ कुटुंबांना मोफत किराणा वाटप करण्यात आला. मागील एक महिन्यापासून या किराण्याचे वितरण टप्प्याटप्प्याने चालू आहे. या किराणा वितरणासाठी छत्रपती युवाशक्ती ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष कष्ट घेतले.
दक्षिण नगरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या ऑफिस कडून ६० किराणा किटे तर शिरूर चे प्रसिद्ध सराफ श्री शांतनु भैय्या खंडारे यांच्या माध्यमातून विधवा महिलांना १२० किराणा किटे मिळाले. या मान्यवरांच्या आर्थिक सौजन्यातून मोफत किराणा वितरण करण्यात आले. येळपणे गावचे युवा उद्योजक श्री सतीश आण्णा धावडे, पुणे सोसायटीचे चेअरमन श्री नवनाथ देवकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप पवार पाटील, माजी चेअरमन श्री बाळासाहेब पवार, श्री अजितराव पवार पाटील, सरपंच श्री संतोष भाऊ शिंदे, श्री भवरलाल सराफ शिरूर, श्री चंदुकाका सराफ अहमदनगर व छत्रपती युवाशक्ती ग्रुप यांच्या संयुक्त आर्थिक सहकार्यातून ४४४ कुटुंबांना मोफत किराणा वाटप करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीतून गरजुवंतांना मदतीचा हात