लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा येथील श्री बाळासाहेब नामदेव लोणकर हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून कोळगाव येथे कार्यरत होते. सहाय्यक पदापासून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली.कृषी विभागात कोळगाव,मांडवगण, दौंड,हवेली आदी ठिकाणी त्यांनी ३५ वर्षे सहा महिने अशी प्रदीर्घ सेवा केली.नियत वयोमानानुसार सेवेतून ते सेवानिवृत्त झाले. शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांना उपलब्द्ध करून त्यांनी शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांचा कामाची दखल घेऊन शासनाने त्यांना उत्कृष्ट कर्मचारी, आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित केले होते.ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.
सेवानिवृत्त झाल्यामुळे कोळगाव मध्ये त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक हेमंत नलगे,माजी सभापती भैय्या लगड,कुकडी कारखान्याचे संचालक विश्वास थोरात,माजी सरपंच डी.एल.लगड साहेब,सरपंच वर्षा काळे,माजी चेअरमन विजय नलगे, सोसायटी चेअरमन दादा निर्फळ,माजी सरपंच मधूकका लगड,सतीश लगड,मिठू मेजर, नितीन दुबल सुभाषराव कुरुमकर, दिगंबर बोरुडे, अनिल बोरुडे, सदाशिव उंडे आदीं मान्यवरांनी उपस्थित राहून.या प्रसंगी लोणकर यांना शुभेच्छा दिल्या