येळपणे येथे कौतुकास्पद, लोकहिताचा सामाजिक उपक्रम
श्रीगोंदा (प्रतिनिधी) तालुक्यातील येळपणे येथे युवा उद्योजक श्री सतीश आण्णा धावडे यांच्या संकल्पनेतून व लोकवर्गणीतून श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या आवारात एक लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या पाण्याच्या टाकी मुळे विद्यालयातील विद्यार्थी  व मंदिर परिसरात येणाऱ्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होईल. तसेच या टाकी मुळे मंदिर परिसर विद्यालयात वृक्षरोपण करून संवर्धन व सुशोभीकरण करण्यास मदत होईल व हेच मुख्य उद्दिष्ट या कामाचे आहे.

       लोकभिमुख निर्णय घेतल्यामुळे या कामाचे परिसरातील जनतेकडून, कौतुक होत आहे. याप्रसंगी युवा उद्योजक श्री सतीश आण्णा धावडे, चेअरमन श्री नवनाथराव देवकर, ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप पवार पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जेडी पवार सर, सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री ठाणगे काका, सोसायटी संचालक डी एस पवार, श्री गोरक्ष पवार, श्री नीलेश ढुस व छत्रपती युवाशक्ती ग्रुपचे संचालक याप्रसंगी उपस्थित होते.