इंडियन टॅलेंट सर्च (आयटीएस) परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची सुवर्ण कामगिरी



 

बेलवंडी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची जागरूकता निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेचा पाया वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने इंडियन टॅलेंट सर्च लातूर यांच्यातर्फे महाराष्ट्रात सर्वत्र मास्टर चॅम्प स्पर्धा आयोजित केली जाते, या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, बेलवंडी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील प्रथम 50 मध्ये विद्यालयातील कु.वैद्य श्रेया दिगंबर(इयत्ता 8 वी) 100 पैकी 94 गुण मिळवून या विद्यार्थिनीने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक व कु.झावरे वैष्णवी आबासाहेब (इयत्ता 6 वी) 100 पैकी 92 गुण मिळवून या विद्यार्थीनीने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.ही बाब विद्यालयाच्या व ग्रामस्थांच्या दृष्टीने अभिमानाची आहे.परीक्षेस बसलेले इतर विद्यार्थीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

या विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व  सेवक वृंद, पालक, विद्यालयाचे प्राचार्य  संपतराव पवार, उपप्राचार्य दादाजी बागुल पर्यवेक्षक पंढरीनाथ कोकाटे यांचे मार्गदर्शन मिळाले. या परीक्षेसाठी विभागप्रमुख म्हणून कामकाज श्री दिपक कुलांगे यांनी पाहिले व मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल विद्यालयाचे व विद्यार्थिनींची सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री आण्णासाहेब शेलार, श्री ज्ञानदेवराव हिरवे,सौ.सुप्रियाताई पवार, श्री उत्तमराव डाके, श्री जयसिंगराव लबडे, श्री गोपीचंद(दादा) इथापे, श्री दिनेश (आबा) इथापे, श्री पोपटराव बेल्हेकर, श्री सावताशेठ हिरवे, श्री सुभाषराव काळाणे, श्री विलासराव भोसले, श्री संग्रामराव पवार, श्री सोपानराव हिरवे, श्री चंद्रकांत(आप्पा)लबडे, श्री मधुकरराव शेलार, श्री तात्यासाहेब हिरवे, श्री अशोकराव काळाणे, श्री दिलीपराव रासकर, श्री कुंडलिकराव मगर, तसेच शालेय विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत, भैरवनाथ सोसायटी, विविध पतसंस्था व बँक यांचे पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी केले..

 


झावरे वैष्णवी आबासाहेब

 


वैद्य श्रेया दिगंबर