लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव परिसरामध्ये रात्री अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .दरम्यान रविवारी सायंकाळी नऊ वाजता विजेच्या कडकडाटासह लिंपणगाव, मुंढेकरवाडी, काष्टी, आनंदवाडी, होलेवाडी, शेंडेवाडी, आधी परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामासाठी यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू उभे राहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर कडकडाट सुरु होता श्रीगोंद्यातील साळवन देवी रस्त्यावरील विद्युत सबस्टेशन मध्ये वीज पडल्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मोठा ट्रान्सपोर्ट जळाल्यामुळे तालुक्यात अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला . परंतु विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रायल घेऊन मी चालू करण्याचा प्रयत्न केला .परंतु ट्रान्सफर मध्ये विज कोसळल्याने सकाळी दहा वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. इतर भागांमध्ये मात्र कुठेही दुर्घटना घडली नसल्याचे बोलले जात आहे. चालू वर्षी पावसाळ्याच्या प्रारंभीच हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी आहेत उत्कृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी यात्रा कृषी सेवा केंद्रांमध्ये चाचपणी करताना दिसत आहेत .असेच सुरूवात पावसाने खरीप हंगामामध्ये शेवटपर्यंत केल्यास चालू वर्षी खरीप हंगाम यशस्वी होऊ शकतो असे शेतकरी सांगतात.
गेल्यावर्षी मात्र पाऊस खरीप हंगामामध्ये दोन महीने उशीर केल्यामुळे खरीप हंगाम पाऊस व पाण्याअभावी वाया गेला चालू वर्षी अशीच साथ पावसाने दिल्या पिण्याच्या पाण्यासह खरीप हंगाम देखील उत्तम प्रकारे हाती लागेल अशी शेतकरी सांगतात.